पुणे- मुंबई-पुणे द्रुतगति मार्गावर आज दुपारी 2 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत पुणे लेनवर हा ब्लॉक असणार असून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील पुणे लेनवर आज मेगा ब्लॉक - traffic
मुंबई-पुणे द्रुतगति मार्गावर द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसविण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर आज दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसविण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने द्रुतगति मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तर पुण्याकडे जाणारी अवजड आणि मालवाहतूक वाहने खालापूर टोलनाका व कुसगाव टोलनाक्याच्या पूर्वी किलोमीटर ५२.५०० येथे थांबविण्यात येणार आहे. याची नोंद प्रवाशी आणि चालकांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक यांच्याकडून करण्यात आले आहे.