महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! जिल्हा परिषदेच्या गोडावूनमधील भंगार टेम्पोत आढळला कोट्यवधींचा औषधसाठा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. मात्र, ती औषधे भंगार टेम्पोत आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भंगार टेम्पोत आढळलेला कोट्यवधीचा औषधसाठा

By

Published : Aug 10, 2019, 7:56 AM IST

पुणे- जिल्ह्यातील डोंगराळ व आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांना आरोग्याच्या सेवा मोफत मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र चालवली जातात. मात्र, ही आरोग्य सेवा देत असताना कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात औषध आरोग्य केंद्रात जात नसून जिल्हा परिषदेच्या गोडावूनमधील भंगार टेम्पोत ठेवला जातो. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी उघडकीस आणला आहे.

भंगार टेम्पोत आढळला कोट्यवधीचा औषधसाठा


पुणे जिल्हा परिषदेने २०१४-१५ साली कोट्यवधींची औषधे खरेदी करण्यात आली होती. मात्र, २०१६ मध्ये ती कालबाह्य झाली होती. औषधे, गोळ्या व रक्त तपासणी किट भंगार टेम्पोत धूळखात पडले आहेत. तात्कालीन आरोग्य प्रशासनाने कोरेगाव पार्क येथील जागेत निरंक करण्यात आलेल्या बंद टेम्पोमध्ये दोन वर्षांपासून लपवून ठेवण्यात आल्याचा प्रकार बुट्टे-पाटील यांनी उघडकीस आणला आहे.

गोडाऊनच्या आवारात भंगार टेम्पो असून त्याच्या पाठीमागी हौद्याला दोन कुलूप लावण्यात आले होते. तपासणी दरम्यान दोन कुलूप असल्याने त्या टेम्पोवर संशय आला. त्यानंतर कुलूप काढून टोम्पोची पहाणी केल्यास त्यामध्ये औषधांचा प्रचंड साठा दिसून आला. इतका मोठा औषधसाठा आला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शरद बुट्टे-पाटील यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details