पुणे - पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक ( Shivsena Leader Raghunath Kuchik ) यांच्यावरती काही दिवसापूर्वी एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करत गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ( Fir Against Raghunath Kuchik in Shivajinagar Police Station ) त्यानंतर काही दिवसांनी त्या पीडित तरुणीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. या प्रकरणात भाजपनेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh on Raghunath Kuchik Case ) यांनी देखील कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर पुणे पोलिसांवरदेखील वाघ यांनी आरोप केले होते. ( Chitra Wagh Alleged on Pune Police ) यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( MCW Rupali Chakankar on Chitra Wagh ) यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यातील पोलिसांना बदनाम करण्याचा कट काही लोकांनी हातात घेतला आहे. राज्यातील पोलीस हे सक्षमपणे काम करत आहे. पोलिसांवर टीका करताना विचार करावा. रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणात 3 ते 4 दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या. ( MCW Rupali Chakankar on Raghunath Kuchik Case ) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली. यावेळी पुणे पोलोसांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महिलांच्या विविध योजनांची माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कुचिक यांच्या मुलीचे देखील राज्य महिला आयोगाला पत्र -