पुणे: जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर याची ज्येष्ठ गणिततज्ज्ञ अशी ओळख आहे. त्यांचे पुण्यात राहत्या घरीच निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षाच्या होत्या. या पुर्वी त्यांना स्तनाचा कर्करोग झाला होता त्यावर त्यांनी यशस्वी मात केली होती. मात्र नंतर त्यांना फुप्फुसाचा कर्करोगाने ग्रासले. त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मंगला नारळीकर पुर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे होत्या. त्यांचा जन्म 17 ने 1943 रोजी झाला. त्यांनी 1962 साली मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर 1964 साली त्यांनी गणितात एमए केले. यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना त्यावेळी सुवर्णपदकही मिळाले होते. 1964 ते 1966 या कालावधित त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत गणित विषयाच्या सहाय्यक आणि नंतर सहयोगी संशोधक या पदांवर काम केले. त्यांनी 1967 ते 1969 या काळात केंब्रिज विद्यापीठातही गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले.