पुणे -पुण्यातील कात्रज येथील गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलिंडरचे स्फोट ( Gas cylinder explodes Pune) झाले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. 5 वाजल्याच्या सुमारास अग्निशमन दलाला कॉल आला होता की, कात्रज येथील गंधर्व लॉन्स जवळील गोडाऊन येथे सिलिंडर स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, घटनास्थळी वीस सिलिंडरचा स्फोट झाले आहेत. अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. अजूनही कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे सांगितले जाते आहे.
वीस सिलिंडरचा स्फोट - पुण्यातील कात्रज जवळील गंधर्व लॉन्स येथे सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गॅस सिलिंडरचे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटमुळे सदरील गोडाऊनला आग देखील लागली होती. या गोडाऊनमध्ये जवळपास वीस सिलिंडरचा स्फोट एकदाच झाल्याने. आग मोठी भीषण होती. मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु गोडाउनचा मालक सागर पाटील आणि त्याच्यासोबत एक इसम किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.