महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भीमाशंकर यात्रा सुरू झाली तरी मंदोशी घाट बंदच

भीमाशंकर परिसरात मागील १५ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राजगुरुनगर-भीमाशंकर रोडवर मंदोशी घाटात रस्त्यासह डोंगरकडा कोसळून या घाटातील मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

मंदोशी घाट बंदच

By

Published : Aug 1, 2019, 7:52 PM IST

पुणे - आजपासून श्रावण मास सुरू झाला आहे. त्यामुळे देशभरातून अनेक भाविक १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला येत असतात. मात्र, मंदोशी घाट बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, टोकावडेवरुन कारकुडीमार्गे भीमाशंकरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

भीमाशंकर यात्रा सुरू झाली तरी मंदोशी घाट बंदच

भीमाशंकर परिसरात मागील १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राजगुरुनगर-भीमाशंकर रोडवर मंदोशी घाटात रस्त्यासह डोंगरकडा कोसळून या घाटातील मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

मंदोशी घाटात डोंगरासह रस्ता वाहून गेल्याच्या घटनेला ८ दिवस उलटले आहेत. परंतु, प्रशासनाकडून ही घटना गांभीर्याने घेतली जात नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याठिकाणी फिरकलेही नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या मार्गाचा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details