महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून, आरोपी फरार - pimpri chinchwad news

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत, लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेल्या पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. सौरभ जाधव असे मृताचे नाव आहे. आरोपी अय्याज आणि सोन्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Man killing wife's boyfriend in pimpri chinchwad pune
पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून खून, आरोपी फरार

By

Published : Sep 14, 2020, 2:38 PM IST

पुणे - लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेल्या पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सौरभ व्यंकट जाधव (वय 28 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अय्याजच्या पत्नीने मृत सौरभशी विवाहापूर्वी प्रेमसंबध होते. त्यांची ओळख सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून झाली. यातून त्यांनी फोन नंबरची देवाण-घेवाण केली आणि व्हाट्सअ‌ॅपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. ही बाब अय्याजला कळाली. तेव्हा त्याने पत्नीला समजावून हे प्रकरण मिटवले. पण त्याच्या मनात सौरभविषयी राग होता.

अय्याजने, त्याचा सराईत गुन्हेगार मित्र सोन्या बाराथे यांच्यासह सौरभचा खून करण्याचा प्लॅन आखला. त्याने सौरभला फोन करून औंध जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बोलावून घेतले. सौरभ तिथे आल्यानंतर अय्याज आणि सोन्या या दोघांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. यात सौरभचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी सुशांत व्यंकट जाधवने सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -रिक्षात विसरलेले 11 तोळे सोने अन् रोख रक्कम परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सन्मान

हेही वाचा -Video: महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन चिमुकल्यांसह कार कालव्यात कोसळली अन्..

ABOUT THE AUTHOR

...view details