पुणे - पिंपरी चिंचवड परिसरात पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या नराधमाने त्याच्या १० वर्षीय मुलीच्या समोरच हे भयानक कृत्य केले. त्यानंतर तो फरार झाला दरम्यान याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
दारुड्या पतीने मुलीसमोरच वायरने आवळला पत्नीचा गळा, पुण्यातील धक्कादायक घटना - killed
आरोपी पती उत्तम जाधव हा पत्नी वंदना आणि मुलांना दररोज मारहाण करत होता. त्यांच्यात नेहमी वाद होत होते. वंदना आणि उत्तम यांना ओंकार आणि दीपाली अशी दोन मुले आहेत.
खून झालेल्या महिलेचे नाव वंदना उत्तम जाधव असे आहे. पती उत्तम महादू जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती उत्तम जाधव हा पत्नी वंदना आणि मुलांना दररोज मारहाण करत होता. त्यांच्यात नेहमी वाद होत होते. वंदना आणि उत्तम यांना ओंकार आणि दीपाली अशी दोन मुले आहेत.
आरोपी उत्तम जाधव याला दारूचे व्यसन होते. बुधवारी तो दुपारी दारू पिऊन घरी आला होता. तेंव्हा देखील त्याने मुलांना आणि पत्नी वंदनाला मारहाण केली होती. त्याचप्रकारे रात्री देखील असाच प्रकार घडला. मुलांना आणि पत्नीला आरोपी उत्तमने जेवण करू दिले नाही आणि मध्यरात्री त्याने वायर घेऊन मुलीसमोर पत्नीचा गळा आवळून खून केला. या घटनेत त्या बेशुद्ध झाल्या त्यांना घरासमोरील स्नानगृहात टाकले. घराला कडी लावून आरोपी फरार झाला. आत अडकलेल्या मुलीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जाग केले. बेशुद्ध झालेल्या वंदनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठआण्यात गुन्हा दाखल केला आहे.