महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेचा पैशासाठी खून, आरोपी गजाआड - सोने

आरोपी आनंद निकम याने राधा अगरवाल यांचा खून करून मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिला. अगरवाल यांच्याकडील सोने चोरण्यासाठी त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी निकम याला अटक केली आहे.

आरोपी आनंद निकम

By

Published : Jul 15, 2019, 5:40 PM IST

पुणे- मुंढवा परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा फेसबुकवरील मित्राने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेला ताम्हिणी घाट परिसरात नेले आणि तिचा खून केला. महिलेच्या अंगावरील चोरलेले सोने पोलिसांनी जप्त केले असून आरोपीलाही अटक केली. आनंद शिवाजी निकम असे आरोपीचे नाव असून राधा अगरवाल असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा अगरवाल या २२ जूनपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांत दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान फेसबुकवर निकम व राधा मित्र असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

आरोपी निकमचे नाश्ता आणि चहाचे छोटेसे हॉटेल आहे. राधा यांच्यासोबत निकमची फेसबुकवरून ओळख झाली होती. दोघे अधूनमधून भेटत होते. आरोपीवर दोन लाखांचे कर्ज होते. राधा यांच्या अंगावरील सोने पाहून त्याने ते चोरण्याचे ठरवले. सोने चोरून त्याला कर्ज फेडायचे होते.

आरोपी आनंद निकम २२ जूनला राधा हिला ताम्हिणी घाट परिसरात फिरण्यासाठी म्हणून घेऊन गेला. त्यानंतर निर्जन ठिकाणी राधा यांना नेऊन त्यांचा खून केला. घटनास्थळी पोलिसांना राधा यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. आरोपीने राधा यांना फोटो काढण्यासाठी सोने घालून येण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या सोने घालून आल्याही होत्या. पण त्या बेसावध असल्याचे पाहून आरोपीने त्यांचा खून केला आणि मृतदेह झुडपात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला १६ जुलैपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details