महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला कोणताच धोका नाही - अजित पवार - deputy cm ajit pawar

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते हे सरकार टिकणार नसल्याचा दावा करत आले आहेत. प्रत्यक्षात मात्र हे सरकार आपलं एक एक पाऊल रोवत पुढे जात असल्याचे दिसत आहे.

Breaking News

By

Published : Mar 7, 2020, 3:11 PM IST

पुणे- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पाठबळ आहे, तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मावळमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे अनेक नेते हे सरकार टिकणार नसल्याचा दावा करत आले आहेत. प्रत्यक्षात मात्र हे सरकार आपलं एक-एक पाऊल रोवत पुढे जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे व्यवस्थित काम करत आहे. कोणी काय म्हटलंय त्याच्याशी काही घेणं देणं नसल्याचे स्पष्ट केले आहे.

.

ABOUT THE AUTHOR

...view details