महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्री निमित्त पुण्याच्या भिमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी - भिमाशंकर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशी ओळख असलेल्या पुणे येथील भिमाशंकर मंदिर आज रात्रीपासून भाविकांसाठी खुले होणार आहे.

भिमाशंकर मंदिर

By

Published : Mar 3, 2019, 5:05 PM IST

पुणे - माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशी ओळख असलेल्या पुणे येथील भिमाशंकर मंदीर रात्रीपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.मंदीर समितीच्या वतीनं भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे

भिमाशंकर

भिमाशंकरला डाकिन्नम भिमाशंकरम या नावानेही ओळखलं जातं. त्रेतायुगातला शिवशंकराचा भक्त आणि वरदान मिळाल्याने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रुप धारण करुन त्रिपुरासुर राजाचा वध केला त्यानंतर शिवशंकराचे शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले

ABOUT THE AUTHOR

...view details