पुणे -हर हर महादेवचा जयघोष... रुद्र मंत्रपठण... शिवभक्तीचा जागर अशा भक्तिमय वातावरणात जगभरातील एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी ऑनलाईन महारुद्राभिषेक Maharudrabhishek by Shiva devotees केला. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांना अभिवादन, तसेच विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी हा रुद्राभिषेक Maharudrabhishek for world peace झाला. वाराणसी येथील काशी विश्वनाथ, बारा ज्योतिर्लिंग आणि देशभरातील शिवालयात रुद्रमंत्राचा नाद दुमदुमला.
१४१ देशांतील हिंदूंचा सहभाग - महारुद्राभिषेकाचे संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांच्यासह जगभरातील शिवभक्तांच्या वतीने उडुपी येथील युवा उद्योजक, आत्मा फाउंडेशनच्या संचालक रश्मी सामंत यांनी काशी विश्वनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख मनोहर ओक, लंडन येथील अलेक्स हॅन्की व शिवभक्त पवार यांनी रुद्राभिषेक केला. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सहभागी होते. त्याला जगभरातील शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी ३.३० ते ४.३० या कालावधीत महारुद्राभिषेक झाला. १४१ देशांतील हिंदूंनी यात सहभाग घेतला.
उपक्रमाला अनेकांचे सहकार्य लाभले - माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, श्री ओंकारेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त धनोत्तम लोणकर, भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या कार्याध्यक्ष प्रियंका शेंडगे-शिंदे आदी उपस्थित होते. बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्यासह क्रिएटिव्ह कार्व्ह प्रायव्हेट लिमिटेडचे पवन सराफ, समसारा कॅपिटलचे मनीष जालान, पार्टेक्स एनव्हीचे संस्थापक गुंजन भारद्वाज, इनोप्लेक्सस कन्सलटिंग सर्व्हिसेसचे अमित आननपरा यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.