माध्यमांसोबत बोलताना आमदार जयंत पाटील आणि अबू आझमी पुणे :पुण्यातील अल्पबचत भवन येथे शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी, श्रमिक मुक्ती दल यांच्या वतीने दोन दिवसीय सत्ता परिवर्तन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
भाजपला रोखण्यासाठी एकत्र : यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी गेल्या एक वर्षापासून राज्यातील छोटे पक्ष तसेच संघटना एकत्र आले आहे. जरी आमचे विचार वेगळे असले, मतभेद असले तरी आम्ही भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलो आहे. आमची ताकद कमी आहे. पण आम्ही विचारांचे पक्के आहोत. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. आमच्या विचारांचे जे पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. मला वाटत नाही, शरद पवार हतबल झाले आहेत. शरद पवार हे शरद पवार आहेत, असे यावेळी भाई जयंत पाटील म्हणाले.
हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न :यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी म्हणाले की, जेलमध्ये चक्की पिसायला लावू म्हणणारे आज सत्तेत आहेत. आज देशात महात्मा गांधी यांच्या आरोपीची मूर्ती बनविली जात आहे. तसेच हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील सरकार हे ईडीचे सरकार आहे. व्यक्तींना विचार असला पाहिजे. आज सत्तेच्या लालसेपोटी आणि भीतीपोटी विचार बदलत आहेत. येत्या 2024 ला राज्यात ईडी सरकार दिसणार नाही. यांचा पापाचा घडा भरला आहे. शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत. एखादा मोर्चा जर भाजप विरोधी होणार असेल, तर आम्ही त्याला नक्की पाठिंबा देणार आहोत, असे देखील यावेळी अबू आझमी म्हणाले.
हेही वाचा :
- Sharad Pawar Reaction: डॉ. मो. स. गोसावी यांच्याशिवाय शैक्षणिक क्षेत्र अपूर्ण, त्यांच्या नावाचा लौकिक राहील- शरद पवार
- Chhagan Bhujbal On Sharad Pawar : शरद पवारांचे माझ्यावर विशेष प्रेम, येवल्यातील सभेवरुन भुजबळांचा पवारांना टोला
- Stop Called Vitthal To Sharad Pawar : शरद पवारांना विठ्ठल म्हणणे थांबवा; बडवे शब्दाने परिवाराचा अवमान, महंत सुधीरदास महाराजांचा आक्षेप