महाराष्ट्र केसरीत कोण मारणार बाजी? पुणे :पुण्यात सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेसाठी मल्ल मैदानात उतरले आहे. यात मानाची महाराष्ट्र केसरी गदा कोण जिंकणार याकडे सर्व कुस्ती प्रेमिचे लक्ष लागले आहे. कुस्तीचा महाकुंभ म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे पाहिले जाते. त्यासाठी अनेक पैलवान चार पाच वर्ष सराव करतात. महाराष्ट्र केसरीची माळ गळ्यात पडण्यासाठी मल्लांना सरावाची गरज असते. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट देशात असल्यामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरीसाठी मल्लांनी दोन वर्षाची प्रतिक्षा संपली असून मल्ल मैदानात दंड थोपटून उभे आहेत.
65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात सुरू :मल्ल सकाळी रोज उठणे, रनिंग ,पेटी व्यायाम खाणे, असे सगळे त्यांच्या दिवसभराचा कार्यक्रम असतो. यावर्षी आपल्या गावाचे ,आपल्या तालमीचे ,आपले स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी मोठ्या जिद्दीने हे पैलवान सराव करत आहे. त्यांच्या या सरावाला दोन वर्षे जो थोडासा ब्रेक लागला होता.तो आता संपला आहे. कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धा 65 वी पुण्यात सुरू आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे.
महाराष्ट्र केसरीची अपेक्षा :या स्पर्धेसाठी विविध गटात रंगतदार लढत बघायला मिळत आहे. माती तसेच मॅट प्रकारात कुस्तीचा खेळ आखाड्यात रंगला आहे. विविध भागातून येणाऱ्या प्रत्येक मल्लांना बक्षिसाची आशा आहे. मात्र, महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्यासाठी मल्लांना प्राणाची बाजी लावावी लागणार आहे.
यंदा भत्ता डायरेक्ट अकाउंटला जमा :महाराष्ट्रातून अनेक तालमीचे प्रशिक्षक, पैलवान सहभागी झालेले आहेत. पुण्यातील कोथरूड येथे स्वर्गीय अशोक मामा मोहोळ क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आज सकाळपासूनच कुस्तीप्रेमी कुस्ती शोकिंग, कुस्ती खेळणारी खेळाडू मैदानावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यावर्षी, प्रथमच पैलवानांना जो भत्ता दिला जातो तो त्यांच्याच अकाउंटवर दिला जात आहे. यापूर्वी असा भत्ता डायरेक्ट अकाउंटला दिला जात नव्हता .यावर्षी कुस्तीगीर परिषदेने हा एक चांगला नवीन नियम लागू केल्यामुळे याचा फायदा पैलवानांना होताना दिसत आहे. महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा कोण घेणार याची उत्सुकता महाराष्ट्रासह देशभरात आहे.
हेही वाचा : Wrestling competition महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांची आगेकुच