पुणे - महाराष्ट्रात सर्वत्र ५९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मैदानावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम उपस्थित होते.
पुण्यात महाराष्ट्र दिन साजरा, गिरीश बापट यांनी केले ध्वजारोहण - pune
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्वाना वंदन केले. त्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र उपभोगत आहे, असे बापट म्हणाले.
गिरीश बापट
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्वाना वंदन केले. त्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र उपभोगत आहे, असे बापट म्हणाले. त्यांनी सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजीनगर मैदानावर पोलिसांचे शानदार संचलन पार पडले.