महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामती मतदारसंघ : सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; दीड लाख मतांनी कांचन कुल यांचा पराभव

सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; दीड लाख मतांनी कांचन कुल यांचा पराभव

राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला भाजप पाडणार का खिंडार?

By

Published : May 23, 2019, 6:02 AM IST

Updated : May 23, 2019, 4:53 PM IST

LIVE UPDATE -

  • 2.10 सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय, दीड लाख मतांनी केला कांचन कुल यांचा पराभव
  • 1.00 - सुप्रिया सुळे- 585064, कांचन कुल- 443911
  • 1.00 - सुप्रिया सुळे 1 लाख 21 हजार मतांनी आघाडीवर
  • 12.45 - सुप्रिया सुळे 94 हजार 453 मतांनी आघाडीवर
  • 12.40 - सुप्रिया सुळे - 420435, कांचन कुल - 325982
  • 12.00 - सुप्रिया सुळे 61 हजार 762 मतांनी आघाडीवर
  • 12.00 - सुप्रिया सुळे - 337804, कांचन कुल - 276042
  • 11.22 - सुप्रिया सुळे 37,110 मतांनी आघाडीवर
  • 11.20 - सुप्रिया सुळे - 213031, कांचन कुल - 175921
  • 10.50 - सुप्रिया सुळे - 183252, कांचन कुल - 157219
  • 10.00 - सुप्रिया सुळे - 130561 मते तर कांचन कुल - 113257 मते
  • 9.40 - सुप्रिया सुळे पुन्हा 6 हजार मतांनी आघाडीवर
  • 9.25 - कांचन कुल - 56,735 मते
  • 9.25 - सुप्रिया सुळे - 52,226 मते
  • 9.10 - सुप्रिया सुळे 8 हजार मतांनी पिछाडीवर
  • 8.25- मतमोजणीला सुरुवात; सुप्रिया सुळे आघाडीवर
  • 8.05 - मतमोजणीला सुरुवात

पुणे- यंदा बारामती जिंकणारच म्हणून दंड थोपटणाऱया भाजपचा फुगा अखेर फुटला आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीची पिछेहाट होत असताना सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५७ हजार ४२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एका बाजूला राज्यात राष्ट्रवादीची धूळधाण उडाली असताना सुळे यांनी पक्ष आणि पवारांची प्रतिष्ठा राखली आहे.

सद्याची राजकीय परिस्थिती -

भाजपने या मतदारसंघात जोरदार प्रचारयंत्रणा राबवली होती. कांचन कुल यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात असलेली नातीगोत, आमदार कुल यांची दौंडमध्ये असलेली ताकद तसेच पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांच्याकडूनही जोरदार प्रचार केला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता. सुप्रिया सुळे यांनी खडकवासला, दौंड, पुरंदर यासारख्या अडचणीचा ठरू शकणाऱ्या विधानसभा मतदारसंघात डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला होता.

२०१४ च्या निवडणूकीचा निकाल -

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला तर या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मते पडली होती. तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. आपचे उमेदवार निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांना २६ हजार ३९६ मते मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये २१ लाख १२ हजार ८६२ मतदार आहेत. अखेर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे.

पुरंदरच्या जनतेने शिवतानेंना चपराक दिली - संजय जगताप

सुप्रिया सुळे यांच्या विजयाने आता तरी विजय शिवतारे यांचे डोळे उघडतील, पुरंदरची जनता दुष्काळाने हैराण असताना त्यांच्याकडे लक्ष द्यायचे सोडून मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरमधून कांचन कुल यांना 40 हजारांची आघाडी देण्याची भाषा केली होती, दिव्याखाली अंधार अशी त्यांची अवस्था आहे मात्र पुरंदरच्या जनतेने त्यांना चपराक दिली आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर ते बोलत होते.

बारामती लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा विजय हा दोन्ही काँग्रेसने केलेल्या सुसूत्र प्रचारामुळे झाला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना भरघोस आघाडी मिळाली आणि पुरंदर, भोर, इंदापूर विधानसभा मतदारसंघातून चांगली आघाडी देण्यात यशस्वी ठरली आहे असे जगताप म्हणाले.

Last Updated : May 23, 2019, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details