पुणे- फुटपाथवर झोपलेल्या दीड वर्षीय चिमुरडीला उचलून नेल्यावर अज्ञात व्यक्तीने तिचा लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहर रेल्वे स्टेशन परिसरात घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
फुटपाथवर झोपलेल्या दीड वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; उपचारादरम्यान मृत्यू - पुणे स्टेशन
पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसह झोपलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुरडीला अज्ञात नराधमाने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर रेल्वेच्या डब्यात पाशवी बलात्कार केला व तिला जखमी अवस्थेत सोडून पसार झाला. दरम्यान, सकाळी आठ वाजता पोलिसांना ही चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसह झोपलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुरडीला अज्ञात नराधमाने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर रेल्वेच्या डब्यात पाशवी बलात्कार केला व तिला जखमी अवस्थेत सोडून पसार झाला. दरम्यान सकाळी आठ वाजता पोलिसांना ही चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मालधक्का चौकातील फुटपाथवर राहतात. ते लिंबू, मिरची, खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतात. आज सकाळी पाच वाजता ती आईजवळ झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने तिला उचलून नेले आणि हे संतापजनक कृत्य केले. पोलीस सीसीटीव्हीच्या व्हिडिओ आधारे मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.