शिरूर (पुणे) - शिरूर येथे अवैध्यरीत्या दारूची विक्री करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. मंगेश बाळासाहेब ढोकले (30) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून १ लाखांचा मुद्दमाल जप्त केला आहे.
पुणे; पोलिसांच्या छाप्यात १ लाख ७ हजार रुपयांच्या दारू साठा जप्त - punr crime news
दारू विक्री करणारा सदर युवक पळून जाऊ लागला यावेळी पोलिसांनी त्याला जागेवर पकडत त्याच्या जवळील तब्बल एक लाख सात हजार रुपये किंमतीच्या दोन हजार आठशे ऐकोणनव्वद बाटल्या जप्त केल्या आहे.
शिरूर येथील एका हॉटेलच्या कडेला असलेल्या एका खोलीमध्ये लॉकडाऊन असताना देखील एक इसम देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी खोलीमध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी एक इसम जवळ दारूचे बॉक्स घेऊन बसलेला दिसून आला. दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच त्या ठिकाणी दारू विक्री करणारा सदर युवक पळून जाऊ लागला यावेळी पोलिसांनी त्याला जागेवर पकडत त्याच्या जवळील तब्बल एक लाख सात हजार रुपये किंमतीच्या दोन हजार आठशे ऐकोणनव्वद बाटल्या जप्त केल्या आहे.
पोलीस शिपाई विकास बाळासाहेब मोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मंगेश ढोकले याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.