महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक पुणे महामार्गावर ३६ लाखांची दारू जप्त

देशांतर्गत कोरोना विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून महामार्गावर नाकाबंदी लावण्यात आली आहे.

नाशिक पुणे महामार्गावर ३६ लाखांची दारू जप्त

By

Published : Apr 1, 2020, 8:20 PM IST

पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कडक करत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, नाशिक-पुणे महामार्गावर आळेखिंड येथे नाकाबंदी करत असताना सुमारे 36 लाख रुपये किंमतीचे दारूचे बॉक्‍स घेऊन जाणारे दोन आयशर टेम्पोसह दोन्ही वाहनातील चालक तस्लिम मुन्नवर मोहम्मद (29, रा. असिलपूर, ता. जि. मेरठ, उत्तर प्रदेश) व अजिम मुस्किम त्यागी (वय 29, रा. कमालपूर, जि. हापूड, उत्तर प्रदेश) यांना दोन्ही वाहने व मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

नाशिक पुणे महामार्गावर ३६ लाखांची दारू जप्त

आळेफाटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. देशांतर्गत कोरोना विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून महामार्गावर नाकाबंदी लावण्यात आली आहे. यावेळी आयशर टेम्पो (यूपी 15 डीटी 5876 व यूपी 37 टी 6441) या दोन्ही वाहनांत विदेशी बनावटीच्या दारूंच्या बाटल्यांचे बॉक्‍स भरलेले मिळून आले. एका आयशर टेम्पोत रोकफोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रिअर व्हिस्कीचे 500 बॉक्‍स अंदाजे किंमत 18 लाख 3 हजार 710 रुपये, तर दुसरा आयशर टेम्पोत रोकफोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रिअर व्हिस्कीचे 500 बॉक्‍स अंदाजे किंमत 18 लाख 3 हजार 710 रुपये असा एकूण दोन्ही मिळून 36 लाख 7 हजार 420 रुपये विदेशी दारूचा मुद्देमाल व दोन टेम्पो प्रत्येकी 20 लाखांप्रमाणे असा एकूण 76 लाख 7 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन व पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, माजिक काही समाजघटकांकडून असे उपद्रव केले जात असल्याने प्रशासनाच्या कामावर ताण निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details