महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरूर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार - Chandoh

गुरुवारी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील चांडोह येथे राजेंद्र पानमंद यांच्या शेळ्यांच्या घोठ्यात शिरून बिबट्याने तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरुर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या.

By

Published : Jul 5, 2019, 10:51 AM IST

पुणे- गेल्या अनेक दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली असुन पाळीव पाण्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील चांडोह येथे राजेंद्र पानमंद यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या.

राजेंद्र पानमंद यांच्या घराच्याच बाजुला असलेल्या शेळ्यांच्या घोठ्यात बिबट्याने शिकारीच्या हेतूने हल्ला करत तीन शेळ्यांना ठार केले आहे. त्यामुळे बिबट्याच्या भीतीने नागरीक भयभीत झाले आहेत. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाय योजना करने गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details