महाराष्ट्र

maharashtra

सातकरस्थळ येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या; हत्या कि नैसर्गिक मृत्यू?

By

Published : Nov 6, 2020, 3:29 PM IST

बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. मृत बिबट्याचे शवच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

pune leopard death news
पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बिबट्याचा मृत्यू

पुणे (राजगुरुनगर) - राजगुरूनगर शहराजवळील सातकरस्थळ येथील एका शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची घटना घडली आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. मृत बिबट्याचे शवच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बिबट्याची हत्या कि नैसर्गिक मृत्यू
मागील आठ दिवसांपासून सातकरस्थळ परिसरात बिबट्याचे वास्तव्य होते. अनेक नागरिकांना या बिबट्याने दर्शन दिले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र हाच बिबट्या अचानक मृतावस्थेत आढळला. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूबाबत हत्येचा संशय निर्माण झाला आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे, की हत्या या बाबत वनविभाग तपास करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details