पुणे -उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने घोडीची शिकार केली.
अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या घोडीचा बिबट्याने पाडला फडशा - बिबट्याचा हल्ला
उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला.
हेही वाचा - मंदीतून बाहेर पडण्यासाठी अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करा, मुणगेकरांचा सरकारला सल्ला
या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसह मेंढपाळ भितीच्या छायेखाली आहेत. अवसरी बुद्रुक परिसरात आनंद खंडू दगडे या मेंढपाळाचा वाडा वास्तव्यास आहे. बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हल्ला केला. आनंद दगडे यांनी विरोध केला मात्र, बिबट्या समोर ते हतबल झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने ऊसशेतीला आपल्या वास्तव्याचे ठिकाण बनवले आहे. बिबटे रात्रीच्या सुमारास बाहेर पडून पाळीव प्राणी व माणसांवर हल्ला करत आहेत.