महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leaders' Flex War : नेत्यांची फ्लेक्स बाजी, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याची चुणूक

पुणे महापालिकेची निवडणूक (Pune Municipal Election) जाहीर होण्यास अद्याप महिनाभराचा अवधी असला तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याची (the election campaign) चुणूक दिसू लागली आहे.भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक (Corporator of Bharatiya Janata Party) धीरज घाटे यांनी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नव्या प्रभागात सर्वत्र ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशी घोषणा करीत बॅनर लावले आहेत. घाटे यांना उत्तर म्हणून त्याच बॅनरखाली ‘धीरज.. आम्हाला नाही तुझी गरज. आता घरी जा परत..’ अशाप्रकारचे बॅनर लावले आहेत.

Leaders' flex bet
नेत्यांची फ्लेक्स बाजी

By

Published : Feb 5, 2022, 7:01 AM IST

पुणे: बॅनरबाजीवरून राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त होत असून, निवडणूक जवळ येईल तसे अशा प्रकारचे राजकारण आणखी तापणार असल्याचे सांगितले जात आहे.पुण्यातील प्रभाग रचना चार दिवसांपूर्वी जाहीर झाली.नव्या रचनेप्रमाणे सर्वच इच्छुकांनी आपले प्रभाग समजून घेत कामाला सुरवात केली. याचा भाग म्हणून नगरसेवक घाटे यांनी बॅनरच्या माध्यमातून नागरीकांच्या तातडीच्या गरजांसाठी संपर्क क्रमांक दिले आहेत. याच बॅनरच्या खालच्या बाजूला घाटे यांना विरोध करणारा मजकूर लिहिलेले छोटे बॅनर लावले आहेत (Leaders' Flex War) .हे बॅनर कुणी लावले याचा शोध नगरसेवक घाटे यांचे कार्यकर्ते त्यांच्या परीने घेत आहेत.
घाटे यांना विरोध करताना पुण्याचे खासदार गिरीश बापट व कसब्याचे आमदार मुक्ता टिळक यांनाही विरोध करण्यात आला आहे. ‘नको बापट, नको टिळक, पुणेकरांना पाहिजे नवी ओळख, अशी घोषणा लिहिण्यात आली आहे. या प्रभागात उमेदवारीसाठी खासदार बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट तसेच आमदार टिळक यांच्या चिरंजीवांच्या नावाची चर्चा असल्याने या दोघांच्या नावालादेखील विरोध करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details