जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही; तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, विरोधक आक्रमक
जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही असा इशारा विरोधी पक्ष भाजपकडून महाआघाडी सरकारला देण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
दौंड (पुणे) - राज्यातील वीज ग्राहक वाढीव वीज बिलाचा सामना करत असून राज्यात असलेले सरकार ग्राहक मेळावे घेऊन वाढीव वीज बिल कसे बरोबर आहे, हे जनतेला सांगणार आहे. त्यामुळे जोपर्यंत वाढीव वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राज्यात ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची फरफट -
तसेच या सरकारमध्ये काँग्रेसची फरफट सुरू असून काँग्रेसच्या आमदारांना दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. काँग्रेस देखील सत्तेसाठी लाचार बनली असल्यामुळे ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. या सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नसून सत्ता, स्वार्थ, बगलबच्चासाठी बदल्या व भ्रष्टाचारासाठी हे सरकार पाठबळ देत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. याप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, अविनाश मोटे, तानाजी थोरात, तानाजी दिवेकर, गणेश आखाडे, आदींसह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Nov 20, 2020, 7:15 PM IST