राजगुरुनगर (पुणे) -जुन्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजगुरुनगर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस फौजदाराला तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने आज (दि. 21 जुलै) रंगेहात पकडले. लाचखोर सहाय्यक फौजदारावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम कलम 7 नुसार राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश खोकले, असे सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव असून तो राजगुरुनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
राजगुरुनगर : सहाय्यक पोलीस फौजदारास 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा मागे घेण्यासाठी मदर करतो, असे म्हणत एका सहाय्यक फौजदाराने लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाच घेताना सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार व त्यांचा मुलगा यांच्यावर राजगुरुनगर पोलीसांत कलम 324, 34 नुसार गुन्हा दाखल असलेली तक्रारमागे घेण्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच सहाय्यक पोलीस फौजदार रमेश ढोकले यांनी मागितली होती. त्यानुसार तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाच लुचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरुनगर येथे सापळा रचून पोलिसाला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.
रमेश ढोकले यांनी यापूर्वी लोणीकंद पोलीस ठाण्यात लाच स्विकारताना यापुर्वी रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकदा कारवाई होऊन या पोलिसाने आपले लाच घेण्याचे कारनामे बंद केले नव्हते. त्यानंतर आज राजगुरुनगर येथे लाच स्विकारण्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोरोनाच्या लढाईत पोलीसांचे योगदान म्हणजे कोरोना योद्धा म्हणून केले जात आहे. खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजगुरुनगर पोलिसांनी मोठी मेहनत घेतली असून या लढाईत एका वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशा गंभीर परिस्थितीतही हा सहाय्यक पोलीस फौजदार लाच मागत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.