पुणे -खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. नगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भिमा, शिक्रापूर, रांजणगाव या परिसरात मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांसह रुग्नवाहिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री
नगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असताना सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे महामार्गावर पडलेले खड्डे नागरिकांसह प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.