पालखी दर्शनाविषयी मंदिर अध्यक्ष आणि पोलीस उप आयुक्तांची प्रतिक्रिया पुणे :काल संध्याकाळपासूनच दोन्ही पालख्या पुणे शहरात दाखल झाल्या. त्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कालपासून आतापर्यंत दर्शनाची रांग चालूच आहे. यामध्ये लहान मुले, महिला, नागरिक, त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मोठा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पुणे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले आहे.
दर्शनासाठी रांगाच रांगा :संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या ठिकाणीसुद्धा मोठी चोख व्यवस्था या ठिकाणाच्या विश्वस्तांकडून ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले; परंतु पोलीस बंदोबस्त कडक असल्याने भाविक शिस्तीत दर्शन घेत आहेत.
शेकडो भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शनसुद्धा दोन ते अडीच लाख लोकांनी घेतले असल्याचे त्या ठिकाणच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. काल संध्याकाळपासून दर्शन रांग सुरू आहे. दर्शन रांग हे अखंड सुरू आहे. एक मिनिटसुद्धा दर्शन थांबवण्यात आलेले नाही. अद्यापही शेकडो पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. उद्या सकाळी पाच वाजता अभिषेक होईल. त्यावेळेस फक्त 25 मिनिटे दर्शन थांबवले जाईल. त्यानंतर सहा वाजेपर्यंत पालखी प्रस्थान होईपर्यंत दर्शन नागरिकांना घेता येणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले आहे.
रज्जाक चाचांची मालिशची सेवा : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले आहे. पालखीचा आज पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या मुक्कामाला असताना शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. पुण्यातील साखळीपीर तालीम येथे गेल्या 20 वर्षापासून अब्दुल रज्जाक चाचा हे वारकऱ्यांची सेवा करत आहे. विशेष म्हणजे अब्दुल रज्जाक चाचा हे हैद्राबाद येथे राहायला आहेत. ते पालखीच्या वेळेस पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. विशेष म्हणजे ते स्वतः हे तेल बनवितात. पुण्यात येऊन वारकऱ्यांची मालिश करत असतात.
वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा : अब्दुल रज्जाक चाचा हे पूर्वी पुण्यात रहायला होते. ते जरी मूळचे हैद्राबाद येथील असले तरी ते पुण्यात मुलींच्या येथे काही वर्ष राहायला होते. जडी बुटीपासून तेल तयार करून विविध आजारांवर औषाधोपचार रज्जाक चाचा हे करतात. गेल्या वीस वर्षांपासून रज्जाक चाचा हे पुण्यात वारकऱ्यांची सेवा करत आहे. ते आत्ता 8 ते 10 वर्षापासून ते त्यांच्या मूळ गावी हैद्राबाद येथील नारायण पेठ येथे राहायला गेले. मात्र असे असले तरी ते पुण्यात पालखी आल्यावर पुण्यात येतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.
हेही वाचा:
- Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम, ज्ञानोबाची शिकवण रुजवण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करतात मुस्लिम बांधव
- Greetings Dindi For Palkhi: सर्व धर्मगुरुंच्या वतीने 'त्या' दोन पालख्यांसाठी अभिवादन दिंडी
- Aashadhi Wari 2023: आषाढी वारीला रज्जाक चाचा हैदराबादवरून येतात पुण्यात; मालिश करून करतात वारकऱ्यांची सेवा