महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळशेज घाटात मध्यरात्री दरड कोसळली, दगडांचा ढिगारा बाजुला करण्याचे काम सुरू

कल्याण-अहमदनगर मार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण वाढत आहे. या मार्गावर बुधवारी मध्यरात्री दरड कोसळ्याची घटना घडली असून, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

माळशेज घाटात मध्यरात्री दरड कोसळली

By

Published : Jul 4, 2019, 10:32 AM IST

पुणे - कल्याण-अहमदनगर मार्गावरील माळशेज घाटात पावसाचे प्रमाण वाढत आहे. या मार्गावर बुधवारी मध्यरात्री दरड कोसळ्याची घटना घडली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दरड कोसळल्यानंतर घाट रस्त्यावर दगडांचा ढिगारा बाजुला करण्याचे काम सुरू करण्यात आले असुन, वाहतूक पुर्वपदावर आली आहे.

माळशेज घाटात मध्यरात्री दरड कोसळली

माळशेज घाटात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. पावसाच्या दिवसात या घाटात अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना होतात. त्यातच येथील रस्ताही अरुंद असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. माळशेज घाटात नेहमीच होणाऱ्या दुर्घटना पाहता या ठिकाणी तातडीची उपाययोजना व्हावी, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. मात्र, माळशेज घाटातून प्रवास करताना प्रवाशांनी व पर्यटकांनी धोकादायक ठिकाणावर जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details