पुणे- राजगुरुनगरवरून भिमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावरील मदोशी घाटात रस्ता खचून दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या 24 तासापासून भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सुदैवाने या घटनेनमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
भीमाशंकर : मदोशी घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
राजगुरुनगरवरून भिमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यातवरील मदोशी घाटात रस्ता खचून दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
राजगुरुनगरमार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या मदोशी घाटात पावसाळ्यात अनेकदा अपघाताच्या घडल्या आहेत. तर आता पुन्हा एकदा याच घाटामध्ये रस्ता खचून दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाकडून मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान, भीमाशंकरला जाण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून भोरगिरी करकुडीमार्गे किंवा मंचर घोडेगावमार्गे भीमाशंकरला जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.