महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खंडाळा घाटातील मंकी हिल भागात कोसळलेली दरड हटवली; डाऊन लाईनच्या गाड्या सुरू

दरड कोसळल्याने सर्व गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून हळूहळू पूर्व पदावर येत आहे. दगड काढण्याचे काम सुरू असताना यात एक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे

By

Published : Jul 8, 2019, 11:39 PM IST

दरड कोसळल्याने सर्व गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून हळूहळू पूर्व पदावर येत आहे.

पुणे- मंकीहील खंडाळा घाटात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल येथे कोसळलेली दरड 3 वाजून 45 मिनिटांनी हटवण्यात आली. यानंतर डाऊन लाईनच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. परंतु, मिडल लाईन अद्यापही बंद आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या गाड्या तर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सुरू असून त्या उशीराने धावणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरड कोसळल्याने सर्व गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून हळूहळू पूर्व पदावर येत आहे.

दरड कोसळल्याने सर्व गाड्या थांबलेल्या होत्या. त्यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून हळूहळू पूर्व पदावर येत आहे. दगड काढण्याचे काम सुरू असताना यात एक कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित ठिकाणी पुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सैल झालेले दगड आणि माती थेट रेल्वे ट्रॅकवर येऊन पडलेले पाहायला मिळत आहेत.

ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली होती. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या कर्जत येथे थांबविण्यात आल्या होत्या. अंदाजे दोन ये अडीचच्या सुमारास डाउन लाईन - किमी. ११७ मधे छोटे दगड पडले होते. दगड छोटे असल्या कारणाने तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ ते हटवले व लाईन चालु करुन दिली व २ मेल एक्सप्रेस पास केल्या.

सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा भला मोठा दगड तीनच्या सुमारास डाउन आणि मिडल लाईनच्या किमी. ११५ मधे पडल्याने दोन्ही लाईन ब्लॉक करण्यात आल्या होत्या. दगड मोठा असल्यामुळे ब्लास्टींग करुन तो काढण्यात आला. दरम्यान, दगड काढण्याचे काम सुरू असताना यात एक कर्मचारी जखमी झाला. गंभीर बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मंकी हिल दरम्यान दरड कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे पाहणे महत्वाचे असून तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details