पुणे Lalit Patil Drugs Case : राज्यात ललित पाटील प्रकरणामुळं सध्या ससून रुग्णालय मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. ससून रुग्णालयामधून ड्रग्ज रॅकेट चालत असल्याची माहिती समोर आली होती. या सगळ्यांना ससून हॉस्पिटलचं प्रशासन जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं करण्यात येत होती. अशातच आता मॅटनं संजीव ठाकूर यांना धक्का दिला आहे. मॅटनं त्यांची पुण्याच्या ससून रुग्णालयातील डीन पदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. त्याचसोबत ससून रुग्णालयाचे अस्थिव्यंग उपचार पथक प्रमुख डॉ प्रवीण देवकाते यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.
डीन पदावरील नेमणूक रद्द : कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक रद् करण्यात आली आहे. ससूनचे पूर्वीचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नेमणूक सरकारनं केली होती. मुदतीच्या आधीच बदली झाल्यानं संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीवर डॉ. काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतल्यानंतर संजीव ठाकूर यांची नियुक्ती मॕटनं रद्द केली होती. आता या नियुक्तीवरती हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. जानेवारीत डॉ. संजीव ठाकूर यांची नेमणूक ससून रुग्णाच्या डीन पदावर झाली होती. या नेमणुकीच्या विरोधात डॉ विनायक काळे यांनी मॅट कोर्ट आणि हायकोर्टात दाद मागितली होती. यावर कोर्टानं ठाकूर यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. डॉ. काळे यांची ससूनच्या आधिष्ठाता या पदावर 9 महिन्यातच बदली झाल्यानं काळेंनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ससूनच्या 'डीन'ला दणका; मॅटनं नेमणूक केली रद्द - कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील
Lalit Patil Drugs Case : कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील डीन पदावरील नेमणूक रद् करण्यात आली आहे. यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
Published : Nov 11, 2023, 11:04 AM IST
|Updated : Nov 11, 2023, 12:40 PM IST
पोलिसांच्या कारवाईकडं सर्वांच लक्ष : कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेनंतर विरोधकांनी सातत्यानं ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. डीन संजीव ठाकूर यांची चौकशी व्हावी, त्यांना पदावरुन दूर करावं, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती. आता मॅटनं त्यांनी नियुक्ती रद्द ठरवली आहे. या कारवाईनंतर आता पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात पुढं काय कारवाई करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
- Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मालमत्तेची चौकशी सुरू; पुणे पोलीस दोन दिवसांपासून नाशकात तळ ठोकून
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?
- Lalit Patil Case Update : ड्रग्ज प्रकरणात आरोपी ललित पाटीलसह अन्य दोघांना 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी