महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंबेगाव तालुक्यात ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू - विहिर

सध्या ऊसतोड अंतिम टप्प्यात आल्याने बोरसे कुटुंब परतीच्या प्रवासाची तयारी करत होते. त्यावेळी साहेबराव हे इनामदार वस्तीत एका विहिरीच्या कडेला हात-पाय धुवायला गेले. त्याचवेळी ते पाय घसरुन विहिरीत पडले. दरम्यान, त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू

By

Published : May 3, 2019, 8:19 PM IST

पुणे- ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील इनामदार वस्तीत घडली. साहेबराव गमन बोरसे (वय ४०) असे मृत कामगाराचे नाव आहे.

ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू

सध्या ऊसतोड अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्यांनी पट्टा पाडला असून काही कामगार परतीचा प्रवास करत आहेत. त्याप्रमाणे बोरसे कुटुंबही परतीच्या प्रवासाच्या तयारीत असताना संसाराची आवराआवर करत होते. त्यावेळी साहेबराव हे इनामदार वस्तीत एका विहिरीच्या कडेला हात-पाय तोंड धुवायला गेले. त्याचवेळी ते पाय घसरुन विहिरीत पडले. दरम्यान, त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, स्थानिक नागरिक, महसुल विभाग आणि पोलीस यांच्या मदतीने साहेबराव यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. संबंधित घटनेचा पंचनामा महसुल विभागाने केला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details