पुणे:शहरात मागच्या तीन चार महिन्यांआधी विविध भागात कोयता गँगकडून दहशत माजवली जात होती. या विरोधात पुणे पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली होती. दरम्यान शहरातील सर्वच कोयता गँगवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर एक-दोन महिने या गँगच्या गुंडांकडून कोणतीही दहशत माजविण्यात आली नव्हती. पण आता पुन्हा कोयता गँगने डोके वर काढले आहे.
क्रिकेट बंद पाडून केली मारहाण: या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना आरोपी त्या ठिकाणी आले. हातातील कोयते दाखवत त्यांनी क्रिकेट बंद करा, असे धमकावून शिवीगाळ केली आणि मैदानात दगड फेकले. या सर्वांना घाबरून फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांना बॅटने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कोयते देखील उगारले. आरोपींनी त्या ठिकाणी पार्क केलेल्या चार ते पाच दुचाकी वाहनांची आणि एका चारचाकी वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल केला केला. एकाला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
Koyta Gang Terror In Pune: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा धुमाकूळ....कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड - Koyta Gang in Pune
चार ते पाच जणांच्या टोळक्याने पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात कोयते घेऊन प्रचंड दहशत माजवली. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला आहे. कोयता गँगकडून मार्केट यार्ड येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयता गॅंगला पकडा, बक्षीस मिळवा: पुण्यातील वाढती कोयता गँगची दहशत पाहता पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे आत्ता पुणे पोलीसांकडून कोयाता गँग पकडून देणाऱ्या व्यक्तिला बक्षिस जाहीर केले आहे. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास ३ हजारांचं बक्षीस देण्यात येईल. बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला 10 हजार बक्षीस देण्यात येणार आहे. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.
कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न: विद्येचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. हातात कोयते घेऊन ही गँग थेट दुकानांमध्ये तोडफोड करते. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांची तोडफोडसुद्धा कोयता गॅंगकडून करण्यात येत आहे. कोयत्याने मारहाणीच्या घटना आणि ठिकठिकाणी झालेले फायरिंग यामुळे पुण्याची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच यानिमित्ताने कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.