पुणे -जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी पुणे रेल्वे विभागाच्यावतीने मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्सप्रेस गाडीचे संपुर्ण सारथ्य महिलांकडे देण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली. श्रद्धा तांबे आणि संध्या कुमारी या दोन लोको पायलट महिलांनी ही गाडी चालवली.
महिला दिनानिमित्त कोयना एक्सप्रेसचे सारथ्य महिलांकडे
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी पुणे रेल्वे विभागाच्यावतीने मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्सप्रेस गाडीचे संपूर्ण सारथ्य महिलांकडे देण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली.
कोयना एक्सप्रेसचे सारथ्य महिलांकडे
हेही वाचा -VIDEO : .. त्यामुळे मी कोणाशीही हस्तांदोलन करत नाही, अजित पवारांनी केला खुलासा
महिला दिनानिमित्त 10 महिलांकडे या गाडीची जबाबदारी देण्यात आली. महिलांचा गौरव आणि सक्षमिकरणासाठी पुणे रेल्वे विभागाने हे महत्वपुर्ण पाऊल उचलत कोयना एक्सप्रेसची जबाबदारी ही महिलांकडे देण्यात आली. महिलांनीही ही जबाबदारी समर्थपणे स्वीकारली. यावेळी या महिलांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.