महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : Koregaon-Bhima शौर्य दिनानिमित्त चिमुकल्या धम्म विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष, जाणून घेतला इतिहास

दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील कोरेगाव -भीमा ( Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरेगाव-भीमा  शौर्यदिन (koregaon-bhima  shaurya din) उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी विजयस्तंभाजवळ काही चिमुकल्या धम्म विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे विद्यार्थी बौद्ध धर्माच्या शिक्षणासोबतच आवश्यक शिक्षण घेतात. पहाटे पासूनच येथे ही मुले उपस्थित असून यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढ्याचा इतिहास जाणून घेतला. त्यांना यातून प्रेरणा मिळाली.

By

Published : Jan 1, 2022, 10:10 PM IST

Bhima Koregaon battle
Bhima Koregaon battle

पुणे - दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील कोरेगाव -भीमा ( Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरेगाव-भीमा शौर्यदिन (koregaon-bhima shaurya din) उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी विजयस्तंभाजवळ काही चिमुकल्या धम्म विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे विद्यार्थी बौद्ध धर्माच्या शिक्षणासोबतच आवश्यक शिक्षण घेतात. पहाटे पासूनच येथे ही मुले उपस्थित असून यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढ्याचा इतिहास जाणून घेतला. त्यांना यातून प्रेरणा मिळाली.

Bhima Koregaon battle

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते. यंदा विजयस्तंभ शौर्य दिनाचे 204 वे वर्ष असल्याने या सोहळ्याला खास महत्त्व होते. यानिमित्त विजयस्तंभाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details