पुणे -कोंढवा परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सुरवातीला खातरजमा केली. त्यानंतर धाड टाकून पाच तरुणींची सुटका केली. तर मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 69 वर्षीय व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - संतापजनक ! घरगुती वादातून मुलानेच केली वडीलांची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा एनआयबीएम रोडवरील 'यंग स्पा सेंटर' याठिकाणी सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवून सापळा रचला. त्यानुसार येथील व्यवस्थापक नवीन शहा याने पैसे स्वीकारून या बनावट ग्राहकाला आत सोडले. त्यानंतर या बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे मिसकॉल देऊन इतरांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर इतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच तरुण मुलींची सुटका केली आहे.
या मुलींकडे केलेल्या अधिक चौकशीत अंकित नवीन शहा याच्या मालकीचा हे मसाड सेंटर असल्याचे निष्पन्न झाले. तर 69 वर्षीय नवीन शहा याठिकाणी व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहत होता. सुटका करण्यात आलेल्या तरुणींनी त्यांना पैशाचे आमिष दाखवून येथे आणले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडल्याचे सांगितले. पोलिसांनी नवीन शहा याला अटक केली तर अंकित शहा याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - निर्भया प्रकरण : दोषींना पुढील फाशीची तारीख जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार