महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omkareshwar Temple Pune: पेशवेकालीन साम्राज्याचा इतिहास सांगणारे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर; 50 वर्षांपूर्वीच स्त्री पौरहित्याकडून रुद्रयाग विधी करणारे मंदिर - महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र होम

पेशवेकालीन मंदिरामध्ये पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी घेऊन ओमकारेश्वरचे दर्शन घेतात. खरंतर पेशवेकालीन साम्राज्याचा साक्षीदार आणि इतिहास सांगणारे हे ओंकारेश्वर मंदिर आहे. नेमका या ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास काय आणि त्याचे वैशिष्ट्ये जाणून घेवू या.

Omkareshwar Temple Pune
ओंकारेश्वर मंदिर पुणे

By

Published : Feb 20, 2023, 9:08 AM IST

पेशवेकालीन साम्राज्याचा साक्षीदार पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर

पुणे : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हा पेशवेकालीन साम्राज्याचा इतिहास सांगतो. जवळपास 283 वर्षाचा हे पेशवेकालीन मंदिर आहे. इथे पुणेकर मोठ्या प्रमाणात श्रावण सोमवारी महाशिवरात्रीला गर्दी करतात. नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर आपल्या स्थापनेची 283 वर्षे पूर्ण करत आहे. नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली. तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता.


ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी : मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र, कीर्तिमुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला. यामध्ये नंदीचे शिंग तुटले असून कालांतराने ते शिंग फायबरचे बसविण्यात आले आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर, गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवेकाळापासूनचा मुखवटा आणि पोषाख परिधान करून देवाला सजविले जाते. 1970 पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सुतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली.



प्राचीन मंदिर :पुण्यातील शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिर आहे. मंदिराचा परिसर मुठा नदीत घाटापर्यंत पसरतो. हे प्राचीन मंदिर मराठा साम्राज्यातील शासक कृष्णाजी पंत चित्रव यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू शिवराम भट यांच्या आदेशानुसार बांधले होते असे मानले जाते. महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या बांधकामाला सदाशिवराव चिमणाजी, ज्यांना चिमणाजी अप्पा किंवा भाऊसाहेब म्हणतात, जे मराठा सैन्यात सेनापती होते. त्यांच्या देणग्यांचा आधार होता. चिमणाजींनी बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहा वर्षांपर्यंत दर महिन्याला 1,000 रुपये दिले. त्यांनी निधनापर्यंत मंदिराला नियमित भेट दिली असे मानले जाते. त्यांची समाधी त्यांच्या सन्मानार्थ मंदिर परिसरात आहे. त्याचप्रमाणे काळूबुवा महाराज, केशवराव महाराज देशमुख, नाना महाराज साखरे या प्रमुख धार्मिक व्यक्तींच्या समाधीही मंदिर परिसरात आहेत. विठ्ठल रामजी शिंदे पुलाच्या बांधकामामुळे मंदिराचा परिसरच बदलून गेला आहे.



त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना : पेशव्यांनी ऑक्टोबर 1736 मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला. पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. ‘गाय उतारी शिवालया करविले' असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख आहे. अवघा खर्च पेशव्यांनी केला. कामकाजाचे पौरोहित्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी १३५० रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने १५ रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो.



मंदिराचा संपूर्ण इतिहास :ओंकारेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास या मंदिराचे ट्रस्टी, लोणकर यांनी ईटीव्हीला सांगितलेला आहे. ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातल्या पेशवेकालीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुणे शहरातले सर्वात मोठे मंदिर असून या मंदिराला 285 वर्षाचा इतिहास आहे. पेशव्यांचे अध्यात्मिक हे मंदिर पेशव्यांचे अध्यात्मिक गुरु वेदमूर्ती शिवराम भट चित्राराव याने इसवी सन 1736 ते 1738 या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मंदिर बांधल्यापासून अतिरुद्र विधी करण्याची प्रथा होती. अतिरुद्ध म्हणजे अकरा महारुद्र, एक महारुद्र म्हणजे अकरा लघुरुद्र, आणि एक लघुरुद्र म्हणजे अकरा रुद्राचे पठड, अशी मोठी साखळी असते, या अतिरुद्र विधीचा 150 ब्राह्मणाकडून आठ दिवस विधी केला जात असे. बदलत्या जगाप्रमाणे आता तेवढ्या मोठ्या प्रमाणात विधी होत नाही. आता फक्त महारुद्र करण्यात येतो. शिवरात्रीला मंदिरात महारुद्र करण्यात येतो.


महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र होम : या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, या महारुद्राचा होम आणि हवन स्त्री पौरहित्याकडून करण्यात येतो. ही प्रथा आनंदीबाई लोणकर यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी सुरू केली. ते वैशिष्ट्य आज तागायत मंदिर त्याचे पालन करत असून ते टिकवून ठेवलेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त हा महारुद्र होम होतो. महाशिवरात्रीला रात्रीपासुन बाराला मंदीर सुरू झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी उघडे असते. पहाटे पाचला ग्रह पूजा होते, त्यानंतर भाविकांना अभिषेक करायला परवानगी दिली जाते. दुपारी बारानंतर कुठलीही पूजा केली जात नाही, त्यानंतर रात्रीपर्यंत जल अभिषेक चालू असतो.

हेही वाचा : Somvati Amavasya 2023 : सोमवती अमावस्यचे काय आहे महत्व? जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details