महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त

दारूबंदी असताना अवैद्य दारू विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी तरुणही पुढे येऊ लागले आहेत. मात्र, या तरुणांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत.

By

Published : May 21, 2019, 10:29 PM IST

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त

पुणे- खेड तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आज (मंगळवार) मिरजेवाडी येथील दारू भट्टीवर महिला पोलीस पाटलांनी नागरिकांच्या मदतीने अवैद्य दारू भट्टी उध्वस्त करण्याबरोबरच संपूर्ण झोपडीही उद्धवस्त केली आहे.

खेड तालुक्यात महिला पोलीस पाटलांकडून अवैद्य दारू अड्डे उद्धवस्त

चास येथे ४ दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने महिलांनी एकत्र येऊन गावातील २ अवैद्य दारू अड्डे उध्वस्त केले होते. त्यावेळी दारूभट्टी चालवणाऱ्या महिलांनी संपूर्ण गाव संपवणार अशी धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चास गावातील सर्व दारू धंद्यावर छापा टाकून गुन्हे दाखल केले होते. मात्र, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दारू अड्डे उद्धवस्त करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता.

वर्षापूर्वी चास, कडुस परिसरात दारू बंदी करण्यासाठी महिलांनी मोठे आंदोलन केले होते. दोन्ही गावात दारुबंदी केली. मात्र, एकाच वर्षात या गावांमध्ये पुन्हा दारू अड्डे उभे राहिले. मात्र, महिलांनी पुन्हा दारू अड्डे उद्धवस्त करायला सुरुवात केली आहे. दारू बंदी असताना अवैद्य दारू विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी तरुणही पुढे येऊ लागले आहेत. मात्र, या तरुणांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details