पुणे- लहान मुलांच्या संगोपनात आईप्रमाणेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्या संस्कारातुनच चिमुकल्या मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीला सुरुवात होत असते. ग्रामीण व डोंगराळ भागात अनेक समस्या असताना देखील अंगणवाडी सेविका अविरतपणे काम करत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा महिला बालकल्याण विभाग यांच्या वतीने सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये ४१ महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरवित करण्यात आले.
खेड तालुक्यांमध्ये २ प्रकल्प कार्यालयातंर्गत ४५२ अंगणवाड्यातुन चिमुकल्या मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करत आहेत. मात्र, यांच्या या कार्याची दखल कुणी घेत नाही. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच खेड पंचायत समितीच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील ४१ महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.