पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सध्या 20 हजार 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आणखीन वाढवण्यात येणार आहे. आज सकाळी 11 वाजता खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा 27 हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
खडकवासला ओव्हरफ्लो; धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू - over flow
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सध्या 20700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हा विसर्ग आणखीन वाढवण्यात येणार आहे. आज सकाळी 11 वाजता खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा 27 हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे.
खडकवासला साखळी धरणामध्ये असलेल्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार पाऊस या परिसरात होतो. त्यामुळे एकंदरीतच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतोय. त्यामुळेच सकाळी अकरा वाजल्यापासून आता 27 हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकवासला धरण हे याआधीच शंभर टक्के भरले आहे. आता पानशेत धरण देखील शंभर टक्के भरले असून वरसगाव 90 टक्के तर टेमघर 80 टक्के भरले आहे.