महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी उभारले कारगिल युद्ध स्मारक - MEMORIAL

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. भारतीय जवानांनी शौर्य दाखवत पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या युद्धातील जवानांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी 26 जुलैला कारगिल दिवस साजरा केला जातो.

पुणे

By

Published : Jul 25, 2019, 7:02 PM IST

Updated : Jul 25, 2019, 11:54 PM IST

पुणे- कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण होत असताना देशभरात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणींसाठी शौर्य दिवस पाळला जातो. याच निमित्ताने पुण्यातील एफटीआयआयच्या (FTII) विद्यार्थ्यांनी कारगिल युद्ध स्मारकाची प्रतिकृती उभारली आहे.

'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी घेतलेला आढावा

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. भारतीय जवानांनी शौर्य दाखवत पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या युद्धातील जवानांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी 26 जुलैला कारगिल दिवस साजरा केला जातो. या दिवशी शहिदांची आठवण काढली जाते, त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असते.

या वर्षी कारगिल युद्धाला 20 वर्षं पूर्ण होत आहेत. वीस वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या माध्यमातून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. पुण्यातही कारगिल दिवसाच्या निमित्ताने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात 'एफटीआयआय'च्यावतीने कारगिल वॉर मेमोरियलची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. कारगिल युद्धाच्यानंतर भारतीय लष्कराने या युद्धाची आठवण म्हणून लद्दाखमध्ये वॉर मेमोरियल उभारले आहे. त्याचीच प्रतिकृती एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. संस्थेच्या मुख्य द्वारासमोर हे मेमोरियल उभारण्यात आले आहे.

Last Updated : Jul 25, 2019, 11:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details