महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हातवीजचा काचन धबधबा पर्यटकांना घालतो आहे साद ; तरूणांनी काढला शोधून - junnar

नारायणगाव येथील चार पाच तरुणांनी एकत्र येऊन हातवीज परिसरातील डोंगराळ भागात भटकंती केली. व त्या दरम्यान त्यांनी काचन या धबधब्याला शोधून काढले आहे.

धबधब्याचे छायाचित्र

By

Published : Jul 24, 2019, 12:13 PM IST

पुणे- पावसाळा आला की, निसर्गाचे रुपच बदलून जाते. हिरव्यागार डोंगरातून खळखळणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षनाचे केंद्र बनतात. असाच एक विलोभनिय धबधबा नारायणगावच्या काही तरुणांनी जुन्नर तालुक्यातील हातवीज परिसरात शोधून काढला आहे. काचन असे या धबधब्याचे नाव आहे.

धबधबा पाहून आपला अनुभव सांगताना पर्यटक

जुन्नर तालुक्यातील पश्चिम भाग हा डोंगराळ भाग असून, सद्या पावसामुळे दऱ्या, खोऱ्यातील खळखळून वाहणारे धबधबे पर्यटकांचे मन आकर्षित करित आहे. थंडगार वातावरणात पाण्याचे तुशार पाहायला लोक या परिसरात दाखल झाले आहे. यावेळी नारायणगाव येथील चार पाच तरुणांनी एकत्र येऊन हातवीज परिसरातील डोंगराळ भागात भटकंती केली. व भटकंती दरम्यान त्यांनी काचन या धबधब्याला शोधून काढले आहे. उंचावरुन कोसळणारा हा धबधबा मनमुग्ध करुन टाकणारा आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात या परिसरात विविध प्रकारच्या रानभाज्या पहायला मिळतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी रानमेव्यांचा आस्वादही घ्यायला मिळत आहे.

पावसाळ्यात या परिसरात पांढऱ्या शुभ्र धुक्यात पावसाच्या सरी सुरु असतात. त्यामुळे हिरवेगार डोंगरात सर्वत्र गारवा अनुभवायला मिळतो आहे. यामुळे प्रत्येकजण या परिसरातील सजलेल्या निसर्गाचा आनंद घेताना पहायला मिळत आहे. परिसरातील सुंदरता पर्यटकांना साद घालत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details