पुणे -येत्या काही दिवसात जर पुण्यात कोरोना रुग्ण वाढल्यास सारासार विचार करुनच जम्बो हाॉस्पिटल सुरू केले जाईल, असे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्ण वाढत असून काही निर्बंधही घातले गेले आहेत, पण पुढील काही दिवसात ही संख्या जर वाढली तर त्या अनुषंगाने जम्बो हॉस्पिटल पुऩ्हा एकदा कार्यान्वित करण्याकरता पावले उचलली जातील, असे विभागीय आयुक्त म्हणाले.
जम्बो हॉस्पिटलचे नियोजन करून लसीकरणासाठीही करणार उपयोग - आयुक्त - विभागीय आयुक्त
येत्या काही दिवसात जर पुण्यात कोरोना रुग्ण वाढल्यास सारासार विचार करुनच जम्बो हाॉस्पिटल सुरू केले जाईल, असे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
याकरता प्राथमिक स्वरुपात जम्बो हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधाबाबत अहवाल सादर करण्याकरता सीओईपी कॉलेजची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांनी याबद्दल अहवाल प्रशासनाकडे दयावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आर्थिकदृष्टया जम्बो हॉस्पिटलमधील सुविधांबाबत कंत्राटदारासोबत चर्चा करुन कमी दरात सेवा देण्याबाबत सल्लामसलत करण्यात येणार आहे. प्रसंगी जर जम्बो हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये रुग्ण आल्यास त्या रुग्णास सेवा देण्याचे ससून रुग्णालयाच्या डीन यांनी मान्य केले असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.