पुणे : मागच्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाहीफेक करण्यात आली होती. यानंतर देखील भीम अनुयायींकडून पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केली जात होती आणि आज भीमा कोरेगांव येथील 205 शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे न येता कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विजयस्तंभाला (Vijayastambh) घरूनच अभिवादन केले आहे. यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारलं असता ते म्हणाले की, यांची मानसिकता काय आहे मला माहीत नाही पण परंपरेनुसार एखाद्या तरी ज्येष्ठ मंत्र्याने मानवंदनेसाठी यायला हव होत. नाही आले तर समजून जायचं काय आहे, असे यावेळी आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी शौर्य दिनी व्यक्त केली खंत; म्हणाले...
एका मोठ्या सैन्याविरुद्ध अल्पसंख्याक असलेल्या सैन्याने आपल्या शौर्याने मोठा विजय प्राप्त केला. त्यादिवसची आठवण म्हणून हजारो अनुयायी हे आज भीमा कोरेगाव (bhima koregaon) येथे अभिवादनाला येत असतात. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad on bhima koregaon ) यांनी आज विजयस्तंभला (Vijayastambh) अभिवादन केले. ते म्हणाले की, परंपरेनुसार एखाद्या मंत्र्याने तरी आज मानवंदनेसाठी भीमा कोरेगावला यायला पाहिजे होते.
माझ्या दृष्टीने मोठा विजय : राज्य सरकारकडून कोणताही मंत्री या ठिकाणी अभिवादनासाठी (Vijayastambh Pune) आलेला नाही. यावर आव्हाड यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांची मानसिकता काय आहे हे मला माहीत नाही. माझ्या दृष्टीने हा खूप मोठा विजय आहे. ज्या जातीय वादामुळे दलितांचे सोशितांचे जमिनी काढल्या गेल्या. त्यांना अस्पृश्यतेचा स्पर्श झाला. त्यांना सैन्यातून बाद करण्यात आला. ही अवेहलना जेव्हा सुरू झाली आणि पेटून उठलेल समाज दिसला त्याची ही लाट आहे आणि याला मानवंदना दिलीच पाहिजे. कोण येतंय कोण येत नाहीये, यांच्याशी मला काहीही करायचं नाही, असे देखील यावेळी आव्हाड म्हणाले.
खोटे गुन्हे दाखल केले : आव्हाड यांनी ट्विट केल्याबाबत त्यांना विचारल असता ते म्हणाले की, ज्या पद्धतीने माझ्याबद्दल राजकारण सुरू आहे. खोटे गुन्हा दाखल करण्यात आले. माझ्यावर खोटा कुठलाही गुन्हा चालला असता पण एका बाईला पुढे करून घाणेरडा प्रकार केला आहे. आजही ते माझ्या मनात आहे. अजून पर्यंत गुन्हा मागे घ्यायला हव होता. पण सरकार काहीही बोलायला तयार नाही, असे देखील यावेळी आव्हाड म्हणाले.