पुणे -कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्युला आवाहन केले होते. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, या बंद काळामध्ये काही तरुणांना पुणे-नाशिक महामार्गावर टवाळखोरी करत फिरताना पोलिसांनी अडवले. या तरुणांना चक्क रस्त्यावरच उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
जनता कर्फ्युवेळी पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसांनी टवाळखोरांना दिली 'अशी' शिक्षा
काही तरुण अनेकवेळा मंचर परिसरातून विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या तरुणांना मंचर पोलिसांनी चक्क महामार्गावरच उठाबशा काढायला लावल्या. पोलिसांनी अशा प्रकारे या तरुणांवर कारवाई केली. या तरुणांना चांगलीच अद्दल घडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जनता कर्फ्युवेळी पुणे-नाशिक महामार्गावर पोलिसांनी टवाळखोरांना दिली 'अशी' शिक्षा
जनता कर्फ्यु असल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक बंद होती. या वेळी काही तरुण अनेकवेळा मंचर परिसरातून विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या तरुणांना मंचर पोलिसांनी चक्क महामार्गावरच उठाबशा काढायला लावल्या. पोलिसांनी अशा प्रकारे या तरुणांवर कारवाई केली. या तरुणांना चांगलीच अद्दल घडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हेही वाचा - कोरोना विषाणूमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात दडलेला "शेफ" आला पुढे