महाराष्ट्र

maharashtra

Minister Shivrajsih Chouhan : इन्व्हेस्ट इन एमपी; महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्य प्रदेशात गुंतवणूकीचे आमंत्रण

By

Published : Oct 21, 2022, 2:21 PM IST

वेदांत फोक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn Project ) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान ( Madhya Pradesh Chief Minister Shivrajsih Chouhan ) पुण्यात येऊन महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याच आमंत्रण देणार आहेत.

Minister Shivrajsih Chouhan
Minister Shivrajsih Chouhan

पुणे : वेदांत फोक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn Project ) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान ( Madhya Pradesh Chief Minister Shivrajsih Chouhan ) पुण्यात येऊन महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याच आमंत्रण देणार आहेत. त्यासाठी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधे इन्व्हेस्ट एमपी या सेमिनारच आयोजन करण्यात आलं आहे.


शिवराजसिह चौहान द्योगपतींशी खाजगीत चर्चा करणार : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान हे शुक्रवारी महाराष्ट्रातील आघाडीच्या उद्योजकांशी भेटून त्यांना मध्यप्रदेशमधे गुंतवणूक करण्याच आवाहन करणार आहेत. इन्व्हेस्ट इन एमपी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणूक मध्यप्रदेशला नेण्याचा हा प्रयत्न असणार आहे. विरोधकांकडून हा राजकिय मुद्द्या केला जाण्याची शक्‍यता आहे. शिवराजसिह चौहान यांच्यासोबत त्यांचे उद्योगमंत्री आणि दोन आय ए एस अधिकारी असणार आहेत. मध्य प्रदेश सरकार आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्याकडून ही परिषदेच आयोजित करण्यात आली आहे. इन्व्हेस्ट एम पी या परिषदेनंतर शिवराजसिह चौहान महाराष्ट्रातील उद्योगपतींशी खाजगीत चर्चा करणार आहेत. ज्यामधे टेक्स्ट ईन - बाबा कल्याणी, संजय किर्लोस्कर, अश्विनी मल्होत्रा, सुधीर मेहता हे आणि इतरही उद्योजक सहभागी होणार आहेत.


महाराष्ट्रातील उद्योजकांच्या प्रतिसादाकडे सगळ्यांचे लक्ष: मध्य प्रदेश सरकारकडून आयोजित करण्यात येणारी ही औद्योगिक परिषद दरवर्षी मध्य प्रदेशमधेच आयोजित करण्यात येते. मात्र यावेळेस त्यासाठी महाराष्ट्राची निवड झाल्यान सर्वांच्या भुवया उंचावल्यात. शिवराजसिह चौहान यांच्या या साखरपेरणीला महाराष्ट्रातील उद्योजक कसे प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे. शिवराजसिह चौहान यांच्या या परिषदेला पार्श्वभूमी आहे ती वेदांता- फोक्सकॉन प्रकल्पाच्या वादाची आणि त्या आधारे केल्या जाणाऱ्या अस्मितेच्या राजकारणाची. त्यामुळे मध्य प्रदेश रसकारची ही औद्योगिक परिषद महाराष्ट्रात राजकिय परिषद बनणार आहे.

असे केले आवाहन :कोरोना काळामध्ये मला कोरोना झाला होता. त्यावेळेसच पंतप्रधानाने फाईव्ह बिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करायची ठरवलं तेव्हाच मी मध्यप्रदेशला साडेपाचशे डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे ठरवलेला आहे. त्यामुळे त्यासाठी जे काही सुविधा लागतील जमीन आहे, पाणी आहे, वीज आहे, हे मध्य प्रदेश मध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देईल तसेच उद्योजकांना वेळ देणारा मी मुख्यमंत्री आहे. असं म्हणत त्याने मध्य प्रदेश मध्ये गुंतवणूक करण्याचा आवाहन केला आहे. पुणे ही माझी सासरवाडी आहे. त्यामुळे पुण्यांबद्दल माझ्या मध्ये एक मनामध्ये एक प्रचंड प्रेम आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश मधली पन्नास एकर जमीन आम्ही आयटी सेक्टर साठी ठेवलेली आहे साडेसहाशे एकर जमीन आमच्याकडे आज उपलब्ध आहे. तुम्ही या आणि गुंतवणूक करा आम्ही लगेच देऊ असं म्हणत त्याने उद्योजकांना अनेक आश्वासने दिलेले आहेत. पुण्यातील हॉटेल हयात रीजन्सी या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मध्यप्रदेशचे उद्योग राज्यमंत्री तसेच अनेक अधिकारी त्यांच्यासोबत या परिषदेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्योजकांना हे आवाहन केलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details