पुणे : Internal Dispute In Congress : कालच्या बैठकीत यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचीही उपस्थिती होती. कसबा मतदार संघाचे आमदार हे अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यांच्या न आल्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि त्यांच्यातील गटबाजी ही वरिष्ठांच्या समोर आली आहे. अशातच पुणे शहर काँग्रेसकडून आजच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठकीसाठी जे फ्लेक्स बनविण्यात आला आहे, त्यात देखील आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो वापरण्यात आलेले नाहीत. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही की आमदार रविंद्र धंगेकर हे का आले नाही. मी माहिती घेऊन सांगतो.
पटोले आणि थोरातांमध्ये मतभेद : काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील मतभेदांमुळे संतप्त झालेल्या पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवत अहवाल मागितला होता. महाराष्ट्र युनिटमधील भांडणामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना राज्यातील समस्यांवर त्वरित अहवाल सादर करण्यासाठी विशेष दूत म्हणून नियुक्त केले. काँग्रेसचे संघटना प्रभारी केसी वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एमएलसी निवडणुकीवरून महाराष्ट्र युनिटचे प्रमुख नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे खरगे नाराज होते.