पुणे - मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत १५ फूट उंच असून तेथे पेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे वशिष्ठ असणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अश्या दोन मार्गिका आहेत.या दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक -त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे.
भारतातील सर्वात खोल मेट्रो- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली ३३.३ मीटर (१०८.५९ फूट) असून हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे. या भूमिगत स्थानकाचे आजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत १५ फूट उंच असून तेथे पेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे वशिष्ठ असणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूनी प्रवाश्याना येण्या-जाण्यासाठी पादचारी वा वाहतुकीचे प्रावधान करण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर ११.१० एकर -सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी हि पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक संपूर्ण पुण्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर ११.१० एकर असून या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण७ फाटके लावण्यात येणार आहेत.