महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी लढा; राज्यात पीपीई कीटची शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाते विल्हेवाट

होम क्वारंन्टाईन तसेच आयसोलेशन सेंटरमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुणे शहरात 1 मे ते 17 मे या कालावधीत 25 हजार 260 किलो 'कोविड जैव वैद्यकीय कचरा' निर्माण झाला त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. याटे काम पुण्यातील पास्को एन्व्हायर्नमेंट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. या कंपनीची दररोज 2 हजार 700 किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. मात्र, वाढत्या कोविड रुग्णांसह या कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे.

पुण्यात कोरोना संसर्गाची वाढ, कोविड-19 जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनाचे आव्हान..
पुण्यात कोरोना संसर्गाची वाढ, कोविड-19 जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनाचे आव्हान..

By

Published : May 20, 2020, 4:02 PM IST

Updated : May 23, 2020, 8:27 PM IST

मुंबई- जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या वापरलेल्या पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्कपासून कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून जैव वैद्यकीय (बायो मेडिकल) कचऱ्याबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जात

मुंबईत पीपीई कीटची शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाते विल्हेवाट

जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 27 हजारावर तर मृतांचा आकडा 900 वर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांपासून मृतदेह हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर करावा लागत आहे. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर झाल्यावर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. त्याला जैव वैद्यकीय कचऱ्यात टाकावे लागते. जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या व नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी दिली.

कोव्हिड युद्धात आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट ठरतीये सुरक्षा कवच

पालिका आणि खासगी रुग्णालयात तसेच इतर ठिकाणी वापरण्यात आलेले पीपीई कीट, ग्लोज, मास्क पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगेमध्ये एकत्र केले जातात. तसेच रुग्णालयातील इतर जैविक कचरा काळ्या बॅगेत गोळा करण्यात येतो. मुंबई महापालिकेने शहरातील जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट एसएमएस या कंपनीला दिले आहेत. या कंपनीचे देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ प्लान्ट आहे. या प्लान्टमध्ये पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा तसेच जैविक कचरा गोळा करून जाळला जातो. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा कचरा जाळला जात आहे. त्यामुळे या कचऱ्यापासून मुंबईकरांना लागण होण्याची शक्यता नसल्याचे खान यांनी सांगितले.

मुंबईत 3 हजार मेट्रिक टन जैविक कचरा

मुंबईत काही वर्षापूर्वी 9 हजार मेट्रिक टन कचरा गोळा केला जायचा. नागरिकांनी आपल्या घराजवळ, सोसायटीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा नियम केल्याने सध्या मुंबईत 7 ते 7 हजार 500 मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यात सुमारे 3 हजार मेट्रिक टन जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचरा असतो. हा कचरा रुग्णालये, दवाखाने आदी ठिकाणाहून गोळा केला जातो.

पुण्यात कोरोना संसर्गाची वाढ, कोविड-19 जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनाचे आव्हान..

पुण्यात कोविड-19 जैव वैद्यकीय कचरा निर्मूलनाचे आव्हान

शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनासंसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातल्या महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयासोबतच विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शहरात वाढतोच आहे. त्यात कोरोनावर उपचार केल्यानंतर निर्माण होणार जैव वैद्यकीय कचरा ही मोठी समस्या आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यात हयगय झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने प्रसासनाकडून या कोरोना जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले जाते आहे.

होम क्वारंन्टाईन तसेच आयसोलेशन सेंटरमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुणे शहरात 1 मे ते 17 मे या कालावधीत 25 हजार 260 किलो 'कोविड जैव वैद्यकीय कचरा' निर्माण झाला त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यातील पास्को एन्व्हायर्नमेंट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीची दररोज 2 हजार 700 किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. सध्या शहरात 2 हजार 200 ते 2 हजार 400 किलो कचरा निर्माण होतो आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दररोजच्या या कचऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यात 2 हजार 700 किलोपेक्षा जास्त वाढ झाल्यास अतिरिक्त कचरा हा बारामती येथील जय भवानी बायोमेडिकेअर सिस्टीम या कम्पनीकडे पाठवला जाणार आहे. कोविड-19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापना बाबत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दोन जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे प्रकल्प उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जैव वैद्यकीय कचऱ्यातून अन्य आजार किंवा संसर्ग बळावण्याची दाट शक्यता असल्याने या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याची गरज आहे. यासाठी अशा स्वरुपाचा कचरा संकलित करून त्याची संबंधित यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. जैव वैद्यकीय कचरा स्वत: हून व्यवस्थित संबंधित संस्थेकडे नित्यनियमाने दिल्यास जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल आणि आपले आरोग्य निरोगी राखण्यास आणखी मदत होईल, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

कोव्हिड युद्धात आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट ठरतीये सुरक्षा कवच

नाशकात कोव्हिड युद्धात आरोग्य सेवकांसाठी पीपीई कीट ठरतीये सुरक्षा कवच

नाशिमधील मालेगावात 661 वर पोहोचली असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 851 असून यात 42 जणांचा मृत्यू झाला असून दिलासादायक बाब म्हणजे 601 जण हे कोरोना मुक्तदेखील झाले आहे. शहरात जिल्हा शासकीय रुग्णालय, डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल, डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटल तसेच मालेगावात ग्रामीण रुग्णालय, मालेगाव महानगरपालिका रुग्णालय तसेच प्रत्येक तालुक्यात 1 ते 2 कोरोना कक्ष उभारण्यात आले आहेत. ह्या ठिकाणी कोरोना संशयित रुग्ण आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ह्या हॉस्पिटलमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टर परिचारिका काम करत असून आठ तासांच्या ड्युटीमध्ये प्रत्येक जण एक पीपीई किट्सचा वापर करत असून साधारण एका हॉस्पिटलमध्ये 30 पीपीई किट्सचा वापर केला जात असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे.

वापरलेल्या पीपीई किट्सच्या विल्हेवाटाबाबत विशेष काळजी

कोरोना कक्षात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आठ तास वापरलेले पीपीई ह्यांची काळजीपूर्वक व्हिलेवाट लावली जाते. सुरुवातीला वापरुन झालेले पीपीई किट्स दोन बॅगमध्ये त्याची पॅकींग केली जाते. नंतर त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. बायोमेडिकल वेस्टज डिस्पोजल करण्यासाठी वॉटर रेंज ह्या कंपनीला शासनाने काम दिले आहेत. त्यांचे कर्मचारी ह्या बॅग घेऊन जात बायोमेडिकल वेस्टेजसोबत त्याची शासनाने दिलेल्या नियमानुसार सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे पीपीए किट्स नष्ट केले जातात. कापड आणि प्लास्टिकचा वावर करून पीपीई किट्स तयार केले जातात. ह्यात संपूर्ण गाऊन, हॅन्ड ग्लोज, कॅप, मास्क, शू कव्हरचा समावेश असतो.

Last Updated : May 23, 2020, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details