महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार यांची बहिण नीता पाटील यांच्या पुण्यातील घरी आयकर विभागाचा छापा - पुण्यातही छापा

अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.

नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

By

Published : Oct 7, 2021, 4:34 PM IST

Updated : Oct 7, 2021, 4:53 PM IST

पुणे- अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. त्याचबरोबर पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु असल्याचे सांगितलं जाते आहे.

अजित पवार यांची बहिण नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

पुण्यातील बहिणीच्या घरी देखील आयकर विभागाचे छापे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन बहिणी आहेत. रजनी इंदुलकर हे पुण्यातील बावधन भागात राहतात. तर निता पाटील हे देखील पुण्यातील शिवाजीनगरला राहतात. आणि विजया पाटील या कोल्हापुरात असतात. विजया पाटील यांच्या घरी देखील आयकराचे छापे सुरु आहेत. आयकर विभागाकडून पुणे शहरातही एका सोसायटीतील सदनिकेवर छापा घालण्यात आला. साखर कारखाना व्यवहारातील कारणावरून हा छापा मारण्यात आल्याचे समजते. कर्वे नगरमधील या सोसायटीत सकाळीच आयकर विभागाचे पथक साध्या गणवेशात पोहोचले. त्यांच्याबरोबर पोलिसांचीही एक गाडीही होती.

आयकर विभागाचा छापा

विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर छापे

अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.

Last Updated : Oct 7, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details